Wednesday, May 9, 2012

कॅलीग्राफी : कबीर : सुनता है गुरु ग्यानी

कबीर + कुमार गंधर्व = सुख आहे हे..!! थेट मनापर्यंत पोचतो कबीर..!! "सुनता है गुरु ग्यानी.. ग्यानी ग्यानी.. गगन में आवाज हो रही है.. झिनी झिनी..!!" हे तसाच एक गाणं.. ट्रांस मध्ये घेऊन जाणारं...!! शांत वाटतं ऐकल्यावर.. बरं वाटतं..!! गाणं ऐकतानाच हे सुलेखन केलंय..!!

Sunta hai guru gyaani | series kabeer calligraphy | (created may 12)

Tuesday, May 8, 2012

कॅलीग्राफी : कबीर : उड जाएगा हंस अकेला

उड जाएगा हंस अकेला.. जगदर्शन का मेला...!! हे गाणं एका वेगळ्याच जगात घेऊन जातं..!! त्याचं हे सुलेखन..!!


Ud jaega hans akela | Series kabeer calligraphy | (created may 12)

Monday, May 7, 2012

कॅलीग्राफी : कबीर : चलती चक्की देखकर

चलती चक्की देखकर दिया कबीरा रोये.. दुई पातन के बीचमें साबूत बचा ना कोये..!!
कबीरांच्या या दोह्यांचं सुलेखन केलंय..

Chalti Chakki Dekhkar | Series Kabeer Calligraphy | (Created May 12)

Saturday, May 5, 2012

कॅलीग्राफी : कबीर : कहत कबीरा सुनो भाई..

"कहत कबीरा सुनो भाई साधो जी.." वेड लावलंय या शब्दांनी.. त्यात कुमार गंधर्वांच्या आवाजातनं कबीर ऐकणं म्हणजे पर्वणीच..!! "कोई सुनता है" ही कुमार गंधर्व अन् कबीर यांच्यावरची Documentary पाहाण्याचा योग आला.. अतिशय कहर आहे. त्यामुळे कबीर जास्त ऐकायला लागलोय.. वाचायला लागलोय..!!
अन् त्यातूनच कॅलीग्राफीची "कबीर Series" करतोये.. त्यातलं हे पहिलं सुलेखन.

Kahat Kabeera Suno Bhai Sadho | Calligraphy series kabeer | (created may 12)

Wednesday, May 2, 2012

लेखन : आर्ट इन्स्टॉलेशन : एक घनकथा

वार्षिक कला प्रदर्शनासाठी final year BFA Painting 2012-13 च्या अख्ख्या वर्गाने 'क्यूब' हे दहा ते बारा फुटी आर्ट इन्स्टॉलेशन केलं होतं. त्यासाठी मी आणि स्वाती नामजोशी हिने त्या क्यूब बद्दल लिहिलं होतं.

अ क्यूब स्टोरी.. (एक घनकथा..)
एक क्यूब अथवा घन म्हणजे तरी काय? आतली पोकळी खरंच पोकळ असते?
भूमितीच्या रेषांमधून डोकावताना, अचंबित नजरेने एका पोकळ अश्या घन आकारात त्रिमिती पलीकडे
काहीतरी गूढ, थोडं मिश्कील, काहीसं गहिरं असं अमूर्त अस्तित्व सापडलं... भावलं देखील.
घन आकाराच्या ६ भुजांनी निसर्गातल्या तत्वांचं रूप घेतलंय.
पृथ्वी, अग्नी, वायू, जल, काळ आणि अवकाश ह्यांच्या गाभा-यात अज्ञात मितीचा उदय झाला.
कल्पकतेच्या गाठोड्यातनं वास्तवाचं कोडं उलगडल्यावर चौथं, पाचवं अथवा एखादं बेभान प्रिमाण गवसेल?
अश्या बेभान प्रिमाणाचं भाषांतर करणारी सर्जकता हीच " सिक्स्थ सेन्स " असेल का?
त्रेमितिक बंधनांपलीकडे, उनाड उर्जा अन् असंख्य पैलूंनी गुरफटलेलं असं एक खट्याळ जग जगतंय.
तथाकथित जगाची लांबी, रुंदी, खोली भेदत, एका रोमहर्षक अनुभवात विलीन व्हा...
कदाचित तेंव्हाच ही पोकळी भरून येईल..!!
A Cube Story | Art Installation | (created jan.12)

Tuesday, May 1, 2012

कॅलीग्राफी : महाराष्ट्र देशा

आज महाराष्ट्र दिन..!!
राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा..!! प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा..!!
"महाराष्ट्र देशा.." नावातच भव्यता जाणवते..!! बहु असोत सुंदर... अथवा मराठी पाउल पडते पुढे.. माझी मैना गावाकडं राहिली.. अथवा अजून कोणतेही महाराष्ट्राविषयी गाणं ऐकलं की.. काहीतरी संचारतं अंगात... एक वेगळाच force.. काहीतरी भिनतं अंगात.. शहारे येतात अंगावर.. होय शहारे.. रोमांच वगैरे नाही.. अन् छाती ठोकून सांगावंसं वाटतं जगाला.. होय मी महाराष्ट्रीय आहे.. मराठी आहे..!! "या गोष्टीचा कांगावा का करावा?" असं लोकं म्हणतात.. अरे हो..!! करणार कांगावा.. आहे धमक अंगात.. छातीठोकपणे सांगण्याची.. हा गर्व महाराष्ट्राच्या भूगोलाचा नाहीच मुळी...!! इतिहासाचा आहे तो..!! माज म्हणा वा खाज म्हणा.. आहे आम्हाला.. या ऐतिहासिक समृद्धी.. ऐश्वर्याची...! अर्रे.. "आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत.. तलवारीशी लगीन लागलं जडली येडी प्रीत.." हे फक्त कावितेपुरतं मर्यादित नाहीये..!!


Maharaashtra Desha | Calligraphy | (created may 12)

Monday, April 30, 2012

कॅलीग्राफी : टॅटू : क्षत्रियकुलावतंस

क्षत्रियकुलावतंस म्हणजेच क्षत्रियकुलाचा अंश " Descendant Of Kshatriya's". ही कॅलीग्राफी मी माझा मित्र राहुल बुलबुले व त्याच्या 'गडवाट' परिवारासाठी केली होती केली होती. त्यांनी या कॅलीग्राफीचे टॅटू करून घेतले. त्याबद्दल राहुल यास विचारले असता...

राहुल बुलबुले म्हणतो ,
" 'गडवाट' परिवार हा शिवरायांना आणि गडकिल्ल्यांना अर्पण आहे त्या मुळे आम्ही ठरविले कि Tattoo काढायचा तर शिवरायांशी निगडीतच. खूप महिने मी या गोष्टीवर विचार केला तेव्हा शिवरायांचा बिरुदावली( शिवरायांचा जयजयकार करण्यासाठी वापरण्यात येणारे अलंकार) मध्ये क्षत्रियकुलावतंस हा शब्द मला फार प्रभावशाली वाटतो. कारण हे त्यांच्यातल्या योद्ध्याला म्हणजेच क्षत्रियाला दर्शविते."
Kshatriyakulavatans  (Descendant Of Kshatriya's)  | Calligraphy Tattoo | (Created Apr. 12)

Sunday, April 29, 2012

पोस्टर : गाभा (फर्स्ट लुक)

गाभा नामक हा लघुपट तृतीयपंथीयांवर आधारित आसून त्याचं दिग्दर्शन मी म्हणजेच अमित वाघचौरे याने केलं आहे. या लघुचित्रपटाचे  ICE Short Film Festival 2012 साठी Official Selection झाले आहे.
कथासार : "अशा हातांसाठी ज्यांनी दोन घासांसाठी आपल्या रेषाही बदलल्या अन्  स्वतःचं अस्तित्व मनाच्या खोल गाभ्यात कायमचं  कोंडून घेतलं."


Gaabha | A Short Film By Amit Waghchaure | (Created Mar. 12)

-Crew-
Director : Amit Waghchaure
Writer : Chetan Thorat 
Cinematographer : Pradyumna Chaware 
Editor : Amit Waghchaure 
Music : Pradyumna Chaware 
Production Designer : Sandeep Bhamkar 
Art Direction : Swapnil Tak 
Makeup : Prajakta Malavade 
Costumes : Shrutika Vasave, Ashish Deshpande 

-Cast-
Nakul Sutar 
Ajinkya Bhosale 
Vighnesh Joshi
Sanket Belsare 
Monika Dabade 
Gautami Deshpande 
Jogalekar Kaku

-synopsis- 
A man stuck in a eunuch‘s clothing… a eunuch’s life, departing slowly from reality and losing his morals. Losing himself to a character that he embraced. Stuck on a dark path of a starving penniless life, he sees an inviting light on the gaudy streets of sex trade and more.

Saturday, April 28, 2012

कॅलीग्राफी : ग्रेस : स्तोत्रात इंद्रिये

ग्रेस गेले कळलं.. कॅलीग्राफीच करत होतो तेंव्हा.. हातात स्केचबुक अन् पेन..डोक्यात त्यांचीच गाणी गुणगुणायला लागली.. "ओळखीच्या वाऱ्या तुझं घर कुठे सांग.." या कार्यक्रमातलं त्यांचं रूप.. आवाज.. कार्याक्रमातली ती अदृश्य उर्जा.. सगळं डोक्यात फिरायला लागलं..
त्यांनी केलेल्या बऱ्याच कवितांतील काही ओळी आताच्या वेळेला अगदी साजेश्या वाटल्या.!!
उदा. "तो निजला नाही बाळे.. तो थकला आहे बाळे.. जे निजेत थकते मरते.. ते माय मुलींचे जाळे.. तो उठला म्हणजे देईल.. डोळ्यात नदीचे पाणी..! तू आवर सावर करता.. फिरशील पुन्हा अनवाणी..!"

तसंच हे.."स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे..हे सरता संपत नाही.. चांदणे तुझ्या स्मरणाचे..!! भरून येतंय आत्ताही.. लिहितानाही..!!

ग्रेस समजला नाहीच मुळी कधी.. तो भावला.. प्रकर्षाने जाणवला..!!

GRES Tribute | Calligraphy |  (created mar. 12)

Friday, April 27, 2012

पोस्टर : घर थकलेले संन्यासी

घर थकलेले संन्यासी या माझ्या Shortfilm ने मी दिग्दर्शनात पदार्पण केलं. India is breathing या थीम वर ही shortfilm होती. It is an experimental music video. MIT च्या "Abhivyakti Shortfilm Festival 2011 " मध्ये या लघुपटाला Best Film | Best Cinematography | Best Editing असे ३ award मिळाले.

Cast and Crew
Director : Amit Waghchaure
Concept : Chetan Thorat
Cinematographer : Pradyumna Chaware
Editor : Amit Waghchaure
Music : Stock Music (RHYDHUN- Rhy in you)

Ghar Thakalele Sanyasi (The Tired Monks) | Shortfilm | (Created Nov.11)


:: Synopsis ::
While trying to capture a glimpse of a vague idea of 'Life', underneath the tag of 'labourers' finds people, breathing in rhythm... Day in and day out, these 'labourers' devote themselves to working hard and providing the basics that this amazing civilization needs... Are we killing this rhythm, this Indian spirit wrapped in spiritual colours??These Monks felt a little less suffocated, a little more alive, hoping that the suffocation they often feel in this greedy world doesn’t reach the untouched hearts and the heartbeats of India.

Tuesday, April 17, 2012

पोस्टर : जनहित में जारी

मुंबई येथील 'पृथ्वी थियेटर' येथे होणाऱ्या THESPO 13 या दीर्घांक स्पर्धेत अंतिम चार नाटकात MMCC Art Circle चे जनहित में जारी हे नाटक निवडले गेले होते.. या नाटकात मी अभिनय व Publicity Design केलं होतं.

Janhit mein jaari | poster | (created dec. 11)

Sunday, April 15, 2012

पोस्टर : रामप्रहर

हे पोस्टर रामप्रहर या नाटकासाठी केलं होतं.


Friday, April 13, 2012

कॅलीग्राफी : बंद

हे सुलेखन असंच..!! पेन टॅब्लेटने केलंय..

Bann | Pentablet calligraphy | (created oct. 11)

Thursday, April 12, 2012

कॅलीग्राफी : हमारे राम रहीम

हल्ली खूप कबीर वाचतोये.. ऐकतोये.. असंच एकदा "घट घट कबीर" हा अल्बम ऐकण्यात आला.. कहर आहे..!!शुभा मुद्गल यांचं 'हमारे राम रहीम' हे गाणंही त्यातलंच..!! त्यावरनं हे सुलेखन केलंय..!
नक्की ऐका..! घट घट कबीर (in every body kabeer).. आवडेल तुम्हाला..!

Humaare Raam Rahim by Shubha Mudgal | Calligraphy | (created sept. 11)

Sunday, March 18, 2012

कॅलीग्राफी : वेबसाईट

फक्त पुण्यापुरत्या मर्यादित ऑनलाइन शॉपिंगच्या एका वेबसाईट साठी ही कॅलीग्राफी अन् वेब पेज केलेलं.. अजून यावर बरंच काम करायचंय..!!


ePoona | logo | (Created oct. 11)

ePoona | web page | (Created dec. 11)


Saturday, March 17, 2012

कॅलीग्राफी : टीशर्ट २

या कॅलीग्राफीज काही टीशर्ट ब्रँडस केल्या होत्या.. त्यातील ठराविक काही..!!


Mandal aapla abhaari aahe | calligraphy tshirt | (Created sept. 11)

Friday, March 16, 2012

पेन टॅब्लेट स्केचेस ५

हे रेखाचित्र पेन टॅब्लेटने केलंय. sketch of a nerdy kid..!


I am nerdy..! | pentablet | (created sept. 11)

Thursday, March 15, 2012

कॅलीग्राफी : टीशर्ट १

या कॅलीग्राफीज काही टीशर्ट ब्रँडस केल्या होत्या.. त्यातील ठराविक काही..!!


Badhaai Aap Devnaagari Padh Sakte hai.! | calligraphy tshirt | (created oct. 11)

Buri Najar waale tera muh kaala | calligraphy tshirt | (created oct. 11)

Jay Hind | calligraphy tshirt | (created oct. 11)

Wednesday, March 14, 2012

पेन टॅब्लेट स्केचेस ४

पु. ल. देशपांडे यांच्या 'म्हैस' या कथेवर आधारित ही कॅलीग्राफी केली. गावी शेतात पेन टॅब्लेटने हे live sketch केलंय.

Mhais by Pu. La. Deshpande | Calligraphy and Sketch | (Created may. 11)

Tuesday, March 13, 2012

कॅलीग्राफी : शाळेत येती धमाल..

पक् पक् पकाक या चित्रपटातील एका गाण्यावर आधारित  ही कॅलीग्राफी केली आहे. Bold Permanent Marker ने  ही कॅलीग्राफी करून नंतर एडीट केली आहे.  

Shaalet yeti Dhamaal karati | Calligraphy | (Created sept 11.)

Monday, March 12, 2012

पोस्टर : पालवी

अमेय वाघ याच्या पालवी नामक लघुपटासाठी हे पोस्टर केलं होतं.


Paalavi |shortfilm poster | (created sept. 11)


Sunday, March 11, 2012

पोस्टर : २१२ फॅरेनहाईट

हे पोस्टर चिन्मय कुलकर्णी याने दिग्दर्शित केलेल्या लघुपटाचे आहे. या लघुपटासाठी मी Storyboarding, Titles आणि Publicity Designing केलं आहे. 'Save Water' या थीम वर आधारित हा लघुपट आहे.

212 Fahrenheit | Shortfilm Poster | (Created July 11)

Saturday, March 10, 2012

कॅलीग्राफी : पाउलवाट

या दोन्ही कॅलीग्राफी पेन टॅब्लेटनेच केल्या आहेत..


Paaulwat | Pen Tablet | (Created aug. 11)

Paaulwat | Pen Tablet | (Created aug. 11)

Friday, March 9, 2012

कलर स्केचेस.

हे एक रेफरन्स साठी केलेलं कलर स्केच आहे.

Colored Sketch | Water Colors | (Created  july 11)


Thursday, March 8, 2012

पोस्टर : ३०पैसे / मिनिट

ही दोन पोस्टर्स  ३०पैसे / मिनिट या शॉर्टफिल्म साठी केली होती. कॉल सेंटर मधील एका प्रसंगा बद्दल ही शॉर्टफिल्म आहे. या शॉर्टफिल्मने आईस चित्रपट महोत्सव, राजा परांजपे लघुचित्रपट महोत्सव, पुणे शॉर्टफिल्म फेस्टिवल अशा बऱ्याच महोत्सवात बरीच पारितोषिकं मिळवली आहेत.


30paise/min. publicity design | done by pen tablet | (created aug. 11)

30paise/min. publicity design | Photoshop | (created aug. 11)

Wednesday, March 7, 2012

कॅलीग्राफी : मौत तो यहां...

मौत तो यहाँ बडी सस्ती है.. समुंदर से आके मुफ्त मी बटती है.. मुझे भगतसिंग कि मौत दो...!! हजार बार मरुंगा.. कहाँ बिकती है... पता नही..!!
 A song from marathi film Zenda..!!

Zalzale Toh Apne Bhi Khoon Mein Hai (Created Aug. 11)

Tuesday, March 6, 2012

कॅलीग्राफी : भय इथले संपत नाही

कविवर्य ग्रेस यांच्या अतिशय सुंदर काव्यावरून प्रेरित होऊन ही कॅलीग्राफी केली आहे.


Bhay Ithale Sampat Naahi (Created Aug. 11)

कॅलीग्राफी : दबंग

'अभंग' ची कॅलीग्राफी करताना सुचलं ते हे 'दबंग'..!!!


Dabangg (Created june 11)

Monday, March 5, 2012

कॅलीग्राफी : अभंग

हे सुलेखन पेन टॅब्लेट ने केलंय.


Abhang (Created may 11)

Sunday, March 4, 2012

एक मराठा देश

महाराष्ट्र दिनी सुलेखनाचा एक प्रयत्न..!!

Ek Maraatha Desh (Created  may  11) 

Saturday, March 3, 2012

लोगोज २

काही लोगो works...!

Sane Guruji Shram Sanskar Chhavani (Created apr. 11)
हृद्गंध (hridgandha) (created apr. 11)


लाल घोडा स्टुडीओज (laal ghoda studios)  हृद्गंध (hridgandha) (created apr. 11)


Friday, March 2, 2012

पेन टॅब्लेट स्केचेस ३

हे एका झाडाचे colored sketch आहे. पेन टॅब्लेट ने केलंय..! (Created Apr. 11)


Thursday, March 1, 2012

पेन टॅब्लेट स्केचेस २

हा पेन टॅब्लेट  प्रकार वेड लावणारा आहे..!! कमाल काम होतं त्यावर..! ((Created Mar. 11)