ग्रेस गेले कळलं.. कॅलीग्राफीच करत होतो तेंव्हा.. हातात स्केचबुक अन् पेन..डोक्यात त्यांचीच गाणी गुणगुणायला लागली.. "ओळखीच्या वाऱ्या तुझं घर कुठे सांग.." या कार्यक्रमातलं त्यांचं रूप.. आवाज.. कार्याक्रमातली ती अदृश्य उर्जा.. सगळं डोक्यात फिरायला लागलं..
त्यांनी केलेल्या बऱ्याच कवितांतील काही ओळी आताच्या वेळेला अगदी साजेश्या वाटल्या.!!
उदा. "तो निजला नाही बाळे.. तो थकला आहे बाळे.. जे निजेत थकते मरते.. ते माय मुलींचे जाळे.. तो उठला म्हणजे देईल.. डोळ्यात नदीचे पाणी..! तू आवर सावर करता.. फिरशील पुन्हा अनवाणी..!"
तसंच हे.."स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे..हे सरता संपत नाही.. चांदणे तुझ्या स्मरणाचे..!! भरून येतंय आत्ताही.. लिहितानाही..!!
ग्रेस समजला नाहीच मुळी कधी.. तो भावला.. प्रकर्षाने जाणवला..!!

GRES Tribute | Calligraphy | (created mar. 12) |
No comments:
Post a Comment