वार्षिक कला प्रदर्शनासाठी final year BFA Painting 2012-13 च्या अख्ख्या वर्गाने 'क्यूब' हे दहा ते बारा फुटी आर्ट इन्स्टॉलेशन केलं होतं. त्यासाठी मी आणि स्वाती नामजोशी हिने त्या क्यूब बद्दल लिहिलं होतं.
अ क्यूब स्टोरी.. (एक घनकथा..)
एक क्यूब अथवा घन म्हणजे तरी काय? आतली पोकळी खरंच पोकळ असते?
भूमितीच्या रेषांमधून डोकावताना, अचंबित नजरेने एका पोकळ अश्या घन आकारात त्रिमिती पलीकडे
काहीतरी गूढ, थोडं मिश्कील, काहीसं गहिरं असं अमूर्त अस्तित्व सापडलं... भावलं देखील.
घन आकाराच्या ६ भुजांनी निसर्गातल्या तत्वांचं रूप घेतलंय.
पृथ्वी, अग्नी, वायू, जल, काळ आणि अवकाश ह्यांच्या गाभा-यात अज्ञात मितीचा उदय झाला.
कल्पकतेच्या गाठोड्यातनं वास्तवाचं कोडं उलगडल्यावर चौथं, पाचवं अथवा एखादं बेभान प्रिमाण गवसेल?
अश्या बेभान प्रिमाणाचं भाषांतर करणारी सर्जकता हीच " सिक्स्थ सेन्स " असेल का?
त्रेमितिक बंधनांपलीकडे, उनाड उर्जा अन् असंख्य पैलूंनी गुरफटलेलं असं एक खट्याळ जग जगतंय.
तथाकथित जगाची लांबी, रुंदी, खोली भेदत, एका रोमहर्षक अनुभवात विलीन व्हा...
कदाचित तेंव्हाच ही पोकळी भरून येईल..!!
|
A Cube Story | Art Installation | (created jan.12) |
No comments:
Post a Comment