Thursday, February 3, 2011

पेन टॅब्लेट...

हे माझं पहिलं पेन टॅब्लेटचं स्केच..
खरंच भारी मजा येते टॅब्लेट वर काम करायला...!!!


  1. वडाचा पार (Created jan. 11)

लोगो...

MMCC कॉलेजच्या आर्ट सर्कलचा लोगो बनवत होतो.. मला हे डिझाईन खूप आवडलं... यात ब्रशचे स्ट्रोक्स भारी आल्येत... आणि एकसंघता दिसून येतीये...!!! म्हणून मी हा असा लोगो बनवला.. नवीन करणारच आहे.. पण जो आवडला तो तुम्हाला दाखवावा म्हणून अपलोड केला..!!!


  1. लोगो.. (Created jan. 11)

सुलेखन...!!

ही कॅलिग्राफी मी माझं "अ " हे अक्षर घेऊन केली... आणि मग ती एडीट केली.
  1. "अ" (Created jan. 11)


Wednesday, February 2, 2011

स्केचेस...!!

असेच काही स्केचेस...
  1. ट्री हाउस.. (Created Oct. 10)
    बऱ्याच वेळेस असं वाटतं कि उगाच माणूस सिमेंटच्या जंगलात रहायला आला.. झाडावर रहाणं कित्ती भारी...!! पण आता ते शक्य तर नाही... पण लहानपणापासून एक इच्छा मनात दडलीये कि घर जवळ कुठे ना कुठे एक तरी ट्री हाउस असावं.. बघुयात कधी इच्छा पूर्ण होतीये ती...!!! :)



  2. क्रिएटिव्ह ट्री (Created Oct. 10)
    असंच काहीतरी क्रिएटिव्ह काढावं अशी इच्छा झाली.. मग हे स्केच काढले...!!


आम्ही कोण?

बऱ्याच दिवसापूर्वी काही आवडीच्या निवडक कविता वाचत होतो..
तेव्हा केशवसुतांची आम्ही कोण? ही कविता वाचली... मग या कवितेने प्रेरित होऊन हे सुलेखन केले.

  1. आम्ही अमितराजे..!! (Created nov. 10)



आणि
ती कविता पुढीलप्रमाणे...

आम्ही कोण म्हणूनी काय पुससी? आम्ही असू लाडके-
देवाचे दिधले असे जग तये आम्हांस खेळावया;
विश्वी या प्रतिभाबले विचरतो चोहीकडे लीलया,
दिक्कालांतुनी आरपार अमुची दृष्टी पहाया शके

सारेही बडिवार येथिल पहा! आम्हांपुढे ते फिके;
पाणिस्पर्शच आमुचा शकतसे वस्तूंप्रती द्यावया -
सौंदर्यातीशया, अशी वसतसे जादू करांमाजि या;
फोले पाखडिता तुम्ही, निवडितो ते सत्त्व आम्ही निके!
शून्यामाजी वसाहती वसविल्या कोणी सुरांच्या बरे?
पृथ्वीला सुरलोक साम्य झटती आणावया कोण ते?
ते आम्हीच, सुधा कृतींमधुनीया ज्यांच्या सदा पाझरे;
ते आम्हीच शरण्य, मंगल तुम्हां ज्यांपासुनी लाभते!

आम्हांला वगळा - गतप्रभ झणी होतील तारांगणे;
आम्हांला वगळा - विकेल कवडीमोलावरी हे जिणे!

- केशवसुत

जीना इसीका नाम है

I made this Poster for one talk show named 'Jeena Isika Naam Hai.'
माझी मैत्रीण शीतल साठी हे पोस्टर तयार केलं होतं... आयुष्यातील काही जुन्या आठवणींना उजळ करण्यासाठी हा एक कार्यक्रम होता... म्हणून या पोस्टरचं डिझाईन 'Old School' केलं...
  1. जीना इसीका नाम है (Created jan. 11)



  2. जीना इसीका नाम है (Created Jan. 11)

मी मिस महाराष्ट्र

ही कॅलीग्राफी मी व माझा मित्र स्वप्नील टाक ने मिळून एका 'Beauty Contest' साठी केली...
ही लिंक चेक करा...
http://mimissmaharashtra.com/
  1. मी मिस महाराष्ट्र (Created Sep. 10)