Wednesday, May 9, 2012

कॅलीग्राफी : कबीर : सुनता है गुरु ग्यानी

कबीर + कुमार गंधर्व = सुख आहे हे..!! थेट मनापर्यंत पोचतो कबीर..!! "सुनता है गुरु ग्यानी.. ग्यानी ग्यानी.. गगन में आवाज हो रही है.. झिनी झिनी..!!" हे तसाच एक गाणं.. ट्रांस मध्ये घेऊन जाणारं...!! शांत वाटतं ऐकल्यावर.. बरं वाटतं..!! गाणं ऐकतानाच हे सुलेखन केलंय..!!

Sunta hai guru gyaani | series kabeer calligraphy | (created may 12)

Tuesday, May 8, 2012

कॅलीग्राफी : कबीर : उड जाएगा हंस अकेला

उड जाएगा हंस अकेला.. जगदर्शन का मेला...!! हे गाणं एका वेगळ्याच जगात घेऊन जातं..!! त्याचं हे सुलेखन..!!


Ud jaega hans akela | Series kabeer calligraphy | (created may 12)

Monday, May 7, 2012

कॅलीग्राफी : कबीर : चलती चक्की देखकर

चलती चक्की देखकर दिया कबीरा रोये.. दुई पातन के बीचमें साबूत बचा ना कोये..!!
कबीरांच्या या दोह्यांचं सुलेखन केलंय..

Chalti Chakki Dekhkar | Series Kabeer Calligraphy | (Created May 12)

Saturday, May 5, 2012

कॅलीग्राफी : कबीर : कहत कबीरा सुनो भाई..

"कहत कबीरा सुनो भाई साधो जी.." वेड लावलंय या शब्दांनी.. त्यात कुमार गंधर्वांच्या आवाजातनं कबीर ऐकणं म्हणजे पर्वणीच..!! "कोई सुनता है" ही कुमार गंधर्व अन् कबीर यांच्यावरची Documentary पाहाण्याचा योग आला.. अतिशय कहर आहे. त्यामुळे कबीर जास्त ऐकायला लागलोय.. वाचायला लागलोय..!!
अन् त्यातूनच कॅलीग्राफीची "कबीर Series" करतोये.. त्यातलं हे पहिलं सुलेखन.

Kahat Kabeera Suno Bhai Sadho | Calligraphy series kabeer | (created may 12)

Wednesday, May 2, 2012

लेखन : आर्ट इन्स्टॉलेशन : एक घनकथा

वार्षिक कला प्रदर्शनासाठी final year BFA Painting 2012-13 च्या अख्ख्या वर्गाने 'क्यूब' हे दहा ते बारा फुटी आर्ट इन्स्टॉलेशन केलं होतं. त्यासाठी मी आणि स्वाती नामजोशी हिने त्या क्यूब बद्दल लिहिलं होतं.

अ क्यूब स्टोरी.. (एक घनकथा..)
एक क्यूब अथवा घन म्हणजे तरी काय? आतली पोकळी खरंच पोकळ असते?
भूमितीच्या रेषांमधून डोकावताना, अचंबित नजरेने एका पोकळ अश्या घन आकारात त्रिमिती पलीकडे
काहीतरी गूढ, थोडं मिश्कील, काहीसं गहिरं असं अमूर्त अस्तित्व सापडलं... भावलं देखील.
घन आकाराच्या ६ भुजांनी निसर्गातल्या तत्वांचं रूप घेतलंय.
पृथ्वी, अग्नी, वायू, जल, काळ आणि अवकाश ह्यांच्या गाभा-यात अज्ञात मितीचा उदय झाला.
कल्पकतेच्या गाठोड्यातनं वास्तवाचं कोडं उलगडल्यावर चौथं, पाचवं अथवा एखादं बेभान प्रिमाण गवसेल?
अश्या बेभान प्रिमाणाचं भाषांतर करणारी सर्जकता हीच " सिक्स्थ सेन्स " असेल का?
त्रेमितिक बंधनांपलीकडे, उनाड उर्जा अन् असंख्य पैलूंनी गुरफटलेलं असं एक खट्याळ जग जगतंय.
तथाकथित जगाची लांबी, रुंदी, खोली भेदत, एका रोमहर्षक अनुभवात विलीन व्हा...
कदाचित तेंव्हाच ही पोकळी भरून येईल..!!
A Cube Story | Art Installation | (created jan.12)

Tuesday, May 1, 2012

कॅलीग्राफी : महाराष्ट्र देशा

आज महाराष्ट्र दिन..!!
राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा..!! प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा..!!
"महाराष्ट्र देशा.." नावातच भव्यता जाणवते..!! बहु असोत सुंदर... अथवा मराठी पाउल पडते पुढे.. माझी मैना गावाकडं राहिली.. अथवा अजून कोणतेही महाराष्ट्राविषयी गाणं ऐकलं की.. काहीतरी संचारतं अंगात... एक वेगळाच force.. काहीतरी भिनतं अंगात.. शहारे येतात अंगावर.. होय शहारे.. रोमांच वगैरे नाही.. अन् छाती ठोकून सांगावंसं वाटतं जगाला.. होय मी महाराष्ट्रीय आहे.. मराठी आहे..!! "या गोष्टीचा कांगावा का करावा?" असं लोकं म्हणतात.. अरे हो..!! करणार कांगावा.. आहे धमक अंगात.. छातीठोकपणे सांगण्याची.. हा गर्व महाराष्ट्राच्या भूगोलाचा नाहीच मुळी...!! इतिहासाचा आहे तो..!! माज म्हणा वा खाज म्हणा.. आहे आम्हाला.. या ऐतिहासिक समृद्धी.. ऐश्वर्याची...! अर्रे.. "आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत.. तलवारीशी लगीन लागलं जडली येडी प्रीत.." हे फक्त कावितेपुरतं मर्यादित नाहीये..!!


Maharaashtra Desha | Calligraphy | (created may 12)