पूर्ण लक्ष्मी रोड गणपती बाप्पा मोरयाच्या घोषात मुग्ध झालेला... तितक्यात बाबू गेनू गणेश मंडळाचा गणपती मिरवणुकीत दाखल झाला..
अप्रतिम देखावा..!!! अन जस जसा गणपती जवळ येऊ लागला... जय भवानी जय शिवाजी चे घोष कानी पडू लागले... अन प्रत्यक्षात शिवरायांचे दर्शन झाले... अंग शहारून उठले...
तितक्यात राजे पुढे आले.. म्यानातून तलवारउपसून ती गगनाला भिडवली... अन "हर हर" अशी गर्जना दिली तोच अंगांगातून वीज सळसळून उठली अन बेंबीच्या देठापासून "महादेव" हे उच्चार निघाले नसतील तर नवलंच..!!!
हा प्रसंग कधीही डोळ्यासमोर आलाच की या पुढील ओळी आठवतात...!!
श्वासांत रोखुनी वादळ, डोळ्यांत रोखली आग ।
देव आमुचा छत्रपती, एकटा मराठी वाघ ।
हातात धरली तलवार, छातीत भरले पोलाद ।
धन्य - धन्य हा महाराष्ट्र, धन्य जिजाऊची औलाद ॥
''जय भवानी ॥ जय शिवाजी ॥ ''
No comments:
Post a Comment