आज महाराष्ट्र दिन..!!
राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा..!! प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा..!!
"महाराष्ट्र देशा.." नावातच भव्यता जाणवते..!! बहु असोत सुंदर... अथवा मराठी पाउल पडते पुढे.. माझी मैना गावाकडं राहिली.. अथवा अजून कोणतेही महाराष्ट्राविषयी गाणं ऐकलं की.. काहीतरी संचारतं अंगात... एक वेगळाच force.. काहीतरी भिनतं अंगात.. शहारे येतात अंगावर.. होय शहारे.. रोमांच वगैरे नाही.. अन् छाती ठोकून सांगावंसं वाटतं जगाला.. होय मी महाराष्ट्रीय आहे.. मराठी आहे..!! "या गोष्टीचा कांगावा का करावा?" असं लोकं म्हणतात.. अरे हो..!! करणार कांगावा.. आहे धमक अंगात.. छातीठोकपणे सांगण्याची.. हा गर्व महाराष्ट्राच्या भूगोलाचा नाहीच मुळी...!! इतिहासाचा आहे तो..!! माज म्हणा वा खाज म्हणा.. आहे आम्हाला.. या ऐतिहासिक समृद्धी.. ऐश्वर्याची...! अर्रे.. "आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत.. तलवारीशी लगीन लागलं जडली येडी प्रीत.." हे फक्त कावितेपुरतं मर्यादित नाहीये..!!
|
Maharaashtra Desha | Calligraphy | (created may 12) |