Pages

Wednesday, February 2, 2011

आम्ही कोण?

बऱ्याच दिवसापूर्वी काही आवडीच्या निवडक कविता वाचत होतो..
तेव्हा केशवसुतांची आम्ही कोण? ही कविता वाचली... मग या कवितेने प्रेरित होऊन हे सुलेखन केले.

  1. आम्ही अमितराजे..!! (Created nov. 10)



आणि
ती कविता पुढीलप्रमाणे...

आम्ही कोण म्हणूनी काय पुससी? आम्ही असू लाडके-
देवाचे दिधले असे जग तये आम्हांस खेळावया;
विश्वी या प्रतिभाबले विचरतो चोहीकडे लीलया,
दिक्कालांतुनी आरपार अमुची दृष्टी पहाया शके

सारेही बडिवार येथिल पहा! आम्हांपुढे ते फिके;
पाणिस्पर्शच आमुचा शकतसे वस्तूंप्रती द्यावया -
सौंदर्यातीशया, अशी वसतसे जादू करांमाजि या;
फोले पाखडिता तुम्ही, निवडितो ते सत्त्व आम्ही निके!
शून्यामाजी वसाहती वसविल्या कोणी सुरांच्या बरे?
पृथ्वीला सुरलोक साम्य झटती आणावया कोण ते?
ते आम्हीच, सुधा कृतींमधुनीया ज्यांच्या सदा पाझरे;
ते आम्हीच शरण्य, मंगल तुम्हां ज्यांपासुनी लाभते!

आम्हांला वगळा - गतप्रभ झणी होतील तारांगणे;
आम्हांला वगळा - विकेल कवडीमोलावरी हे जिणे!

- केशवसुत

No comments:

Post a Comment